तळेगाव दशासर :-
येथून जवळच व धामणगाव रेल्वे तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात तसेच ईतर सर्वच क्षेत्रात नेहमी अग्रेसर असणाऱ्या , आणि सामाजिक कार्याचा वसा घेऊन सर्व धर्म समभाव या नात्याने आपले सामाजिक कार्य करणाऱ्या कर्मयोगी फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली काशीखेड व तालुक्यातील महिला ग्रामसघांच्या CRP,ICRP, कृषी शसखी पशु,पशु सखी ,आशा सेवीका, अंगणवाडी सेविका,महिलांचा सत्कार यावेळी करण्यात आला.तसेच यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकार बधुंचा सत्कार यावेळी करण्यात आला. यामध्ये पत्रकार गजानन फिरके व वाढोणा येथील स्वच्छ्ता दुत त्र्यंबकराव गुलाबराव गायकवाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्व प्रथम सावित्रीबाई फुले, संत गाडगेबाबा वं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानतंर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा यावेळी स्वागत करण्यात आले.तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधिर पवार, प्रमुख पाहुणे संदिप गजभिये, सरपंच शारदाबाई ठाकरे, नरेश गावंडे रूपेश तितरे, गजानन फिरके, ग्रामसेवक चव्हाण, सुभाष कांबळे हे होते. यावेळी उपस्थित कर्मयोगी फाऊंडेशन चे जिल्हा प्रमुख विनोद तितरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कडु, विजय पाटील,राजु तितरे,प्रेम वाळके,, अनिल बगाडे,स्वप्निल भापकर, जगदीश काटगळे, गोपाल भापकर,विजय झटाले, प्रकाश ठाकरे, प्रविण पवार,नागेश बोदरे, मंगेश कडु,चेतन निहिटे,गौरव भाटकर,कपिल निहिटे , तालुक्यातील ग्राससंघाच्या महिला CRP, ICRP, उपस्थित होत्या.कार्यकमाचे सुत्रसंचालन सौ.सविताताई बगाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष अनिल बगाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कर्म योगी फाऊंडेशन च्या सदस्यांनी अतीशय मेहनत घेतली.