सावंगा विठोबा नगरीत “चंदन-उटी” उत्सवाचे भक्तिभावात आयोजन

0
23
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथे अमावस्या निमित्त “चंदन-उटी उत्सव” भक्तिभावात संपन्न होणार आहे. श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने दिनांक २५ जून २०२५, बुधवार रोजी दुपारी ४.३० वाजता या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

अलीकडेच गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान झालेल्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी हजेरी लावून शेकडो क्विंटल कापुर जाळत आपल्या मनोकामना मांडल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा एक भक्तीपूर्ण पर्वणी “चंदन-उटी उत्सवाच्या” निमित्ताने अनुभवायला मिळणार आहे.

यावेळी संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल, तसेच विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी आदींची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रमानंतर बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी महाप्रसाद (अन्नदान) समितीच्या माध्यमातून अन्नदानाचा आयोजन करण्यात आले आहे.

संस्थानच्या वतीने सर्व भक्तांना तन, मन आणि धनाने सहभाग घेऊन या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad