सावंगा विठोबा नगरीत अमावस्या निमित्त चंदन उटी उत्सव कापुराच्या अवधूत नगरीत पुन्हा एक भक्तीपूर्ण पर्वणी! हजारो भाविक, भक्तीची ऊर्जा आणि चंदनाचा सुगंध .

0
21
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 चांदुर रेल्वे:- तालुक्यातील प्रसिद्ध असलेले तीर्थक्षेत्र कापुराची यात्रा म्हणून नावलौकिक असलेली अवधूत नगरी श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थानच्या वतीने नुकताच गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. लाखों संख्येने भाविकांनी दर्शन घेऊन शेकडो क्विंटल कापुर जाळून आपल्या मनोकामना अवधूत चरणी मांडल्या, यात्रा महोत्सवा नंतर येथे दिनांक २७ एप्रिल २०२५, रविवारला दुपारी ४.३० वाजता चंदन उटी उत्सव आयोजित केला आहे.

 याप्रसंगी संस्थानचे विश्वस्त मंडळ व स्थानिक तसेच बाहेरगावच्या भाविक भक्तांची उपस्थिती राहणार आहे.

चैत्र अमावस्या निमित्त संस्थानच्या वतीने “चंदन-उटी” उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यानंतर बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी “महाप्रसाद” (अन्नदान) कार्यक्रम होणार आहे. हा महाप्रसाद कार्यक्रम अन्नदान दाते गुणवंत सुपले,मोर्शी यांच्या वतीने व संस्थानच्या अन्नदान समितीच्या नियोजनात होणार आहे.

सर्व भाविक भक्तांनी तन, मन आणि धनाने सहकार्य करून या पवित्र कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे, उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल सर्व विश्वस्त विनायक पाटील, वामन रामटेके, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्नील चौधरी समस्त विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

veer nayak

Google Ad