विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा जल्लोष; सरस्वती शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात. नगराध्यक्षा प्रियंका विश्वकर्मांच्या हस्ते उद्घाटन

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदूर रेल्वे / सरस्वती प्राथमिक शाळा व सरस्वती शिशु मंदिर, चांदूर रेल्वे यांच्या वतीने दिनांक ४ फेब्रुवारी २०२६ रोजी संताबाई यादव मंगल कार्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन ‘कलाविष्कार’ मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन नगराध्यक्षा प्रियंका निलेश विश्वकर्मा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व नवनिर्वाचित नगरसेवक प्राविण्य देशमुख तसेच नगरसेवक हर्षल वाघ हे सत्कारमूर्ती म्हणून उपस्थित होते. त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

याचप्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी रेवण क्षीरसागर यांनी राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. शाळेच्या शिक्षिका मेघा बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या दीप नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा लता देशमुख, सचिव प्रतिभा देशमुख, कोषाध्यक्षा अश्विनी देशमुख, सदस्या अनिता देशमुख तसेच शाळेच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माधुरी बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेतील शिक्षक निलेश इंगोले यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगतीचा सविस्तर आढावा मांडला. ‘कलाविष्कार’ या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक, शैक्षणिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांनी विशेष रंगत आणली. स्नेहसंमेलन यशस्वी होण्यासाठी संस्थेचे प्रतिनिधी तसेच शिक्षक-शिक्षिका जया देशमुख, अंजुम पठाण, वैभव ठोकणे, अभिजीत धकाते, वैशाली देशमुख, वर्षा दुधाट, मोहिनी इंगळे, प्रीती फाटिंग यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच शिशु मंदिरच्या मुख्याध्यापिका निना पोफळे व शिक्षिका ज्योती वनवे, पुनम भेंडे, अश्विनी हटवार, अंजली वाघ यांनीही विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन संदीप देशमुख यांनी केले. उद्घाटनीय भाषणात नगराध्यक्षा प्रियंका विश्वकर्मा यांनी शाळेच्या कार्याचा गौरव केला. शाळेतील कर्मचारी बुले बाई, जुमळे बाई व निकिता बुले यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad