अंजनसिंगी येथे एलसीबीची मोठी कारवाई? अवैध दारू विक्री करणाऱ्या संतोष जयस्वालला अटक?

0
68
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अंजनसिंगी (ता. अमरावती) : अमरावती जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अंजनसिंगी परिसरात धडक कारवाई करत अवैध दारू विक्री करणाऱ्या संतोष जयस्वाल याला रंगेहात अटक केल्याची घटना समोर आली आहे? या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अवैध दारू व्यवसायावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, एलसीबी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे अंजनसिंगी येथे छापा टाकला असता संतोष जयस्वाल हा अवैध दारू विक्री करताना आढळून आला? पोलिसांनी त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू जप्त केली असून, ही दारू बनावट (डुप्लिकेट) असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे? जप्त केलेल्या दारूचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत?

दरम्यान, अटक करण्यात आलेला आरोपी संतोष जयस्वाल हा मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असून, त्याचे धागेदोरे जुन्या अवैध दारू रॅकेटशी संबंधित आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत? या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे?

या घटनेमुळे स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत? परिसरात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू असताना स्थानिक पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले होते का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे?

एलसीबीच्या या कारवाईमुळे अंजनसिंगी व परिसरातील अवैध धंद्यांना आळा बसेल का, तसेच संबंधितांवर कडक कारवाई होईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे?

veer nayak

Google Ad