संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाव कडे रवाना होणार

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

आज दि.१ जानेवारी २०२५ बुधवार ला सलग बाराव्या वर्षी श्री संत गजानन महाराजांची पालखी , दुपारी ठीक १२.०० वाजता नगर परिक्रमा नंतर शेगाव कडे प्रस्थान करणार आहे.

दरवर्षीप्रमाणे पालखी श्री शिव मंदिर देवस्थान,नवरंग चौक,छत्रपती शिवाजी वॉर्ड, श्री हनुमान मंदिर,श्री शनी मंदिर,श्री गजानन महाराज मंदिर ,शास्त्री चौक, त्याचप्रमाणे श्री संत गजानन महाराज मंदिर कोठारी नगर भ्रमण करून श्री संत गजानन महाराज मंदिर महाआरती होईल तदनंतर पायदळ पालखी हिरापूर मारुती मंदिर मार्गे  शेगाव कडे प्रस्थान करणार आहे. 

पालखीचे दर्शन घेण्याकरिता व त्याचप्रमाणे संत नगरी शेगावकडे पायदळ जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्याकरिता समस्त माऊली भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन जय मातादी ऑटो संघटना शास्त्री चौक धामणगाव रेल्वे, व समस्त माऊली भक्त परिवार ने केले आहे.

veer nayak

Google Ad