सध्याच्या काळात अनेक युवक शिक्षण घेतात परंतु नोकरी नसल्याकारणाने निराश होतात व नको त्या विचारांमध्ये होरपळून जाऊन नको त्या गोष्टी करतात. काम करायला व्यवसाय करायला लाजतात काही तर काहीच करायचा प्रयत्न करत नाही व व्यसनामुळे आपले सुदृढ शरीर नष्ट करतात. त्यांना प्रेरणा देणारा युवक हा एका हाताने अपंग असून सुद्धा ई -रिक्षा नागपूर सारख्या शहरात चालून आपला उदरनिर्वाह करतो आहे.
आनंद विश्वकर्मा असे या युवकाचे नाव तो केरला येथील तो रहिवासी आहे. दीड वर्षा आधी केरला येथे कामावर असताना विजेचा करंट लागल्याने त्याला त्याचा उजवा हात गमवावा लागला. एका हाताने तो अपंग झाला मात्र जिद्द न सोडता कुणावरही अवलंबून न राहता तो नागपूरला आला व किरायाची ई रिक्षा कशीबशी त्याला मिळाली. त्याच्या त्या रिक्षाला समोरील काच सुद्धा नाही अशा परिस्थितीत तो डाव्या एका हाताने रिक्षा चालून आपला उदरनिर्वाह चालवीत आहे. परिस्थिती गंभीर असल्याकारणाने त्याला कृत्रिम अंग सुद्धा बसून घेता येत नाही. त्याच्या ई रिक्षामध्ये धामणगाव रेल्वे येथील पत्रकार संतोष वाघमारे हे बसले असता त्याची परिस्थिती पाहून त्याला फाउंडेशन मार्फत कृत्रिम हात बसून देण्याचे आश्वासन दिले आहे. सोबतच त्याला होईल तेवढी मदत करण्याचा सुद्धा आश्वासन दिला आहे. ही एक बातमी नसून एका सुदृढ युवकाला लाजवेल अशा प्रेरणादायी युवकाची सत्य कहानी आहे .आनंद याच्या कार्याला खरंच सलाम.