संत गाडगेबाबा पुण्यतिथि ,सावित्रीबाई फुले जयंती व भीमा कोरेगांव शौर्य दिनाचे औचित्य साधुन पळसखेड येथे धम्मपरिषद # डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिति व सिद्धार्थ विकास मंडळ पळसखेड़ यांचे आयोजन

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे ता. प्र. प्रकाश रंगारी

चांदुर रेल्वे :- चांदुर रेल्वे येथून जवळच असलेल्या पळसखेड
येथे 21 ,22 डिसेंबर ला दोन दिवसीय धम्म परिषद संपन्न झाली . धम्मपरिषदेच्या पहिल्या दिवशी युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी भास्कर पाटिल सर अकोला आणि *गोविंद पोलाड* यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.गावातील यश संपादन केलेल्या युवकांचा सत्कार मंडळाच्या वतीने घेण्यात आला. यावेळी अध्यक्ष स्थानी तहसीलदार पूजा मातोडे आणि प्रमुख पाहुने म्हणून गटविकास अधिकारी तेजश्री आवळे आणि गावात शिक्षण घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असलेले,उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते.सायंकाळी प्रबोधनावर भीम गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.संविधान मनवरे त्यांनी भीम गीता मधून सर्व बौद्ध अनुयायांना व इतर समुदायांना प्रबोधन केले.धम्मपरिषदेच्यादुसऱ्या दिवशी भिक्षु संघाची धममदेशना पार पडली .

धम्मपरिषदेला उद्घाटक म्हणून पूज्य. भंते चित्तज्योति (पुलगांव) ,धम्मपरिषदेच्या अध्यक्ष स्थानी पूज्य भंते धम्मानंद (नागपुर) तर मुख्य वक्ते म्हणून आचार्य महानागरत्न (नागपुर ), व्याख्याते म्हणून पूज्य भंते सुबोध (मोर्शी), भंते संघरक्षित ,भंते सुमंगल थेरो ,भंते सुजात तिस्स ,भंते राहुल आणि भिक्षु संघ उपस्थित होता. या कार्यक्रमाच्या यशस्विते साठी जय शिवाजी क्रीड़ा मंडळ ,अहिल्याबाई होळकर बहुउद्देश्यीय संस्था ,महात्मा ज्योतिबा फुले मंडळ पळसखेड़ यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य सिद्धार्थ विकास मंडळाचे सदस्य ,गावातील आणि बाहेर गावतील जनता उपस्थित होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्म प्रचारक अभय रामटेके यांनी केले. आणि आभार क्षितिज वाल्हे त्यांनी मानले.

veer nayak

Google Ad