साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम च आयोजन –

0
41
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती आर्वी व सकल मातंग समाज आर्वी तर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन
दिनांक :- 18 जुलै 2025 रोजी मायबाई वार्ड कसबा आर्वी येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती आर्वी व सकल मातंग समाज आर्वी द्वारा जगदविख्यात साहित्यसम्राट डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम ठेवण्यात आला होता कार्यक्रमाचे नियोजन जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षा सौ शितल गायकवाड, अध्यक्ष अरुण लांडगे, तत्कालीन अध्यक्ष मंगेश प्रधान यांच्या पुढाकारात करण्यात आले

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे मुख्य मार्गदर्शक म्हणून केदार लोखंडे प्रमुख उपस्थिती राष्ट्रीय लहू शक्तीचे सुधाकरराव वाघमारे होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले मेणबत्ती प्रज्वलित करून हार अर्पण करून पूजन करण्यात आले, डॉक्टरांना भाऊ साठे यांच्या पुण्यस्मरणात सर्व उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी अभिवादन कार्यक्रमात मायबाई वार्डातील नागरिकांची व समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
अभिवादन कार्यक्रमासाठी रुषी गायकवाड राहुल प्रधान हर्षल खडसे कुणाल लांडगे हिमांशु गायकवाड जगदीश गायकवाड आकाश लांडगे अमीत लांडगे अभिषेक इंगळे गोपाल लांडगे सै शितल गायकवाड मोनाली लांडगे माला वानखडे पार्वती प्रधान गिरजा लांडगे मंदा तायडे यांनी अथक परिश्रम घेतले

veer nayak

Google Ad