सेवानिवृत्ती सत्कार सोहळा संपन्न

0
42
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे-

मा. राजकुमार बापूरावजी कोकणे वरिष्ठ लिपिक लाभाचंद मुलचंद राठी विद्यामंदीर कावली व मा. किशोर शंकरराव निचत जि. प. प्रायमरी शाळा मंगरुळ दस्तगीर येथून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्यामूळे त्यांची कार्याप्रती असलेली कार्यतत्परता आणि सामाजिक कार्याबद्दल मॉर्निंग वॉक गृप धामणगाव रेल्वे तर्फे दि. 20/07/2024 रोजी सायंकाळी 7.30 वा. रंगोली हॉल धामणगाव रेल्वे येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अध्यक्ष स्थान मॉर्निंग वॉक गृपचे जेष्ठ सदस्य मा. श्री वसंतजी सदाफळे यांनी भूषविले तर प्रमुख अतिथि म्हणून अमरावतीच्या सेवानिवृत शिक्षिका श्रीमती मंदाताई सुधाकर अभ्यंकर यांनी भूषविले. या प्रसंगी सौ रेखाताई कोकणे व सौ निलीमाताई निचत या देखील उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन करुन करण्यात आली. सूर्यकांत रोडगे यांनी प्रास्ताविकामधून सत्कारमूर्तीचा गुणगौरवं केला. श्री गणेश गावंडे स. शि. जि. प. पूर्व. मा. शाळा सेंदूरजना खुर्द यांनी संचालन तर श्री विनयकुमार खाकसे स. शि. जि. प. हाय. स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव (दाशासार) यांनी आभार मानले. या प्रसंगी श्री राजकुमार कोकणे यांचे कार्याबद्दल

बद्दल उवापोह मॉर्निंग वॉक गुपचे सदस्य श्री हरिहर रंधे यांनी केला तसेच श्री किशोर निचत यांचे कार्याबद्दल बहल मॉर्निंग वॉक गुपवे सदस्य श्री मधुकर खरकाडे यांनी विचार मांडले. सदर कार्यक्रमाला श्री. प्रमोदजी यादव धामणगाव तालुकाध्यक्ष इंग्लिश मिडीयम स्कूल, श्री हिवरे साहेब शाखाव्यवस्थापक अ. जि. स. को. बँक धा. रे.. प्रमोद गायकवाड प्रॉपर्टी डीलर धा. रे, वासुदेव पाटील मुख्याध्यापक श्रीराम विदयालय सोनेगाव खर्डा, केशव पोटे स. शि. जि.प. शाळा वाठोडा, आदित्य अभ्यंकर तसेच मॉर्निंग वॉक गृपचे सर्व सदस्य आपल्या परिवारासह उपस्थित होते. या कार्यक्रमाची सांगता स्नेहभोजनाने झाली.

veer nayak

Google Ad