आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आरोग्याच्या दृष्टिकोनातून उघड्यावर लघु शंका करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे याकरिता उद्धव ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांना निवेदन आठवडी बाजाराला लागून मनीष बॅग हाऊस व तळेकर यांच्या बाजूची गल्ली असे हे मार्केटचे लघु शंका करण्याचे ठिकाण झाले असून शेकडो नागरीक यामध्ये व्यापारी दुकानदार तसेच मार्केटमधील येनारे नेताजी वार्डातील मनीष अरसड यांच्या घराला लागून असे या गल्लीत रहदारी असलेल्या घराच्या भिंतीवर लघुशंका करतात मात्र यावर वारंवार तक्रार देऊन सुद्धा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई होत नाही या गल्लीत अनेकांच्या रहोटी असणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशात रोगराई प्रसन्न्याची भीती सुद्धा आहे. लघुशंका करणाऱ्यास मनाई केल्यास उलट राहणाऱ्यांनाच घाणेरड शिवीगाळ करतात व अंगावर सुद्धा येतात यावर तात्काळ प्रशासनाने लक्ष देऊ उघड्यावर लघुशंका करणाऱ्यास कारवाई करावी अशी राहणाऱ्या नागरिकांची मागणी होत आहे.












