धामणगाव रेल्वे,
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे बालगोपालांच्या आयोजित तान्हा पोळा मध्ये शेकडो बाल स्पर्धकांनी सहभाग दर्शविला यामध्ये प्रथम क्रमांक वेदांत विजय शिलार या बालकांने पटकावले या बालकाला पारितोषिक सोन्याची साखळी पारितोषिक रूपाने प्रदान करण्यात आली दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस आनंदी राऊत हिला प्राप्त झाले सोबतच तिसरा क्रमांक सक्षम शेंद्रे या बालकाने पटकावला चौथा लक्षित जोशी पाचवा ओम काळे सहावा पद्मश्री नखाते आणि सहावा सोनाक्षी हल्लुमारे सह ५१ बक्षीस वितरण करण्यात आले
कार्यक्रमाची सुरुवात भारत मातेची पूजन व स्व. नानाजी देऊळकर यांना अभिवादन करून करण्यात आली
श्री रामदेव बाबा मंदिर परिसरात आयोजित तान्हा पोळा कार्यक्रमांमध्ये मंचावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारणी सदस्य चंद्रशेखरजी राठी, गौरक्षण संस्थांनचे अध्यक्ष नंदकिशोर राठी कथावाचक पं. सुरज शर्मा ज्येष्ठ आरपीएफ बलराज मारवे संयोजक कमल छांगाणी तर परीक्षक म्हणून प्रवीण बंब, सौ निकिता ठाकरे,राजेश झुटी, सौ. अर्चना शेंद्रे उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते बालगोपालांना पारितोषिक वितरण करण्यात आले ५१ पारितोषिक तसेच प्रत्येक स्पर्धक बालकाला दोन बक्षीस देण्यात आले
याप्रसंगी चंद्रशेखरजी राठी नंदकिशोर राठी, बलराज मारवे,पं. सुरज शर्मा यांनी बालकांना मार्गदर्शन केले
—————————-
पुढील सुवर्ण महोत्सवी वर्ष …चंद्रशेखरजी राठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तान्हा पोळ्या ला ४९ वर्ष पूर्ण झालेली असून पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे त्यामुळे पुढील वर्षाच्या कार्यक्रमांमध्ये बालगोपाळांनी मोठ्या संख्येत भाग घेऊन आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करायचे आहे त्यामुळे तयारी करावी अशा शुभेच्छा मी देत असल्याचे संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य चंद्रशेखरजी राठी यांनी आवाहन केले
—————————
संघाचे कौतुकास्पद कार्य …राठी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद कार्य करीत असून तान्हा पोळा हे सुद्धा बालकांच्या कलागुणांना वृद्धिंगत करणारे कार्य आहे त्यामुळे संघाचे कौतुक करीत असल्याचे गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी याप्रसंगी म्हणाले
—————————–
संघाचे उल्लेखनीय कार्य…पं. शर्मा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय कार्यासोबतच बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहित करणारा तान्हा पोळा हा कार्यक्रम सुद्धा विशेष उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे संघाच्या कार्यकर्त्यांचे मी अभिनंदन करतो असे प्रतिपादन कथावाचक पंडित सुरज शर्मा यांनी व्यक्त केले
——————
प्रास्ताविक व परिचय कमल छांगाणी यांनी कार्यक्रमाचे संचालन दर्शन राठी व निखिल पनपालिया यांनी व आभार नगर कार्यवाह चेतन पोळ यांनी मानलेत