रामदेव बाबा उत्सव समिती आर्वी यांच्यामार्फत शैक्षणिक साहित्याचे शिवाजी प्राथमिक शाळा येथे वितरण

0
59
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : नगरपरिषद द्वारा संचालित पीएमश्री शिवाजी प्राथमिक शाळा येथे आज दिनांक 30/08/2025 रोजी रामदेव बाबा उत्सव समितीआर्वी यांच्यामार्फत शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले .
यावेळी माजी नगरपरिषद सदस्य. मा. श्री प्रेमराजजी पालीवाल सर सेवानिवृत्त शिक्षक गांधी विद्यालय आर्वी तसेच सन्माननीय श्री रमेश गहलोत , मा.अमितजी पालीवाल, मा. तरुणजी दवे व इतर सर्व समिती सदस्य उपस्थित होते.
यावेळी छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमात सन्माननीय प्रेमराजजी पालीवाल सर यांनी पूर्वीची शाळा वआताची बदललेली शाळा यावर आपले मनोगत व्यक्त केले. शाळेच्या झालेल्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले शाळा ही समाजाच भूषण असते आणि गुणवत्ता व भौतिक सुविधेच्या बाबतीत प्रगत असलेली शाळा आपल्या परिसरात आहे तसेच जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद मधील एवढी पटसंख्या असलेली एकमेव प्राथमिक शाळा आहे याचा आम्हाला अभिमान आहे.
शाळेच्या प्रगतीमध्ये आम्हालाही योगदान करायचे आहे जे काही सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही शाळेला देण्यास तयार आहोत असे आश्वासन दिले त्यानंतर मुख्याध्यापक व शिक्षक यांचा उत्सव समितीमार्फत फ्रेम व पुष्गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला . शाळेतील 150 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका पदमा चौधरी मॅडम यांनी केले कार्यक्रमाचे संचालन श्री महेश मते सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री राहुल प्रकाश कोरडे सर यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता पूजा धरम ठोक व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

veer nayak

Google Ad