आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस सत्वगुणांचे बाळकडू देणाऱ्या राजमाता जिजाऊ…….तसेच ज्या माणसाच्या ठायी सत्य, पावित्र्य आणि निस्वार्थ वृत्ती या तीन गोष्टी असतील तर त्या माणसाचा नाश करण्याची क्षमता विश्वातील कोणत्याही शक्तीत नाही व हया तीन गोष्टी असल्यावर अखिल विश्व जरी त्याच्या विरोधात उभे ठाकले तरी त्याला तो एकटाच माणूस सहज तोंड देऊ शकेल..!
भारतीयांना स्वदेशाभिमान आणि राष्ट्रभक्तीची शिकवण देणारे, अमर तत्वज्ञ, ज्ञानयोगी स्वामी विवेकानंद….
आज दिनांक – 12 जानेवारी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर यांचे व्यक्तीचित्र रेखाटन करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहेत..