पुलगाव, ६ ऑक्टोबर
रा. स्व. संघ ही राष्ट्रभक्तीचे संस्कार करणारी संस्कार शाळाच आहे. खेळ, संघ गीते, कथाकथन व इतर कार्यक्रम या माध्यमातून बालमनावर संस्कार करण्याचे कार्य संघ शाखेतून केले जाते. चांगल्या संस्काराबरोबरच राष्ट्रभक्तीचा बाणा स्वयंसेवकांमध्ये निर्माण करण्याचे कार्य संघ शाखा करीत असते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अमरावती जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख राजेश झुटी यांनी केले.
पुलगाव नगर बाल स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव रविवार ५ रोजी विवेक शाखा संघस्थान पुलगाव येथे पार पडला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी
ह भ प कल्पना ताई पडोळे होत्या अमृत वचन आराध्य लाखे, सुभाषित शिवम पाठक, वैयक्तिक गीत नचिकेत वरकड यांनी सादर केले. प्रास्ताविक नगर कार्यवाह अतुल लोणकर यांनी
केले. यावेळी घोष, खेळ, दंड योग, दंड क्रमिका आदी प्रात्यक्षिके बाल स्वयंसेवकांनी सादर केली. उत्सवापूर्वी नगरातून पथसंचलन काढण्यात आले.