जिल्हा प्रतिनिधी :- पवन पाटणकर शिराळा
शिराळा (प्रतिनिधी )
मौजे शिराळा येथे मशरूम लागवड तंत्रज्ञाना बाबत येथील ग्रामपंचायत कार्यालयात कृषि विभाग -तालुका कृषी अधिकारी अमरावती व श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेला मागदर्शक म्हणून डाॅ,जि,बी,हेढाऊ डॉ अंकित काळे कृषि सहाय्यक मारोती जाधव उपस्थित होते यावेळी डॉ.जि.बी.हेढाऊ यांनी मशरूमच्या फायदेशीर उत्पादनासाठी जागेची निवड.लागवडीसाठी कंपोस्ट मध्ये बियाणे ( स्पाॅन) मिसळणे.तापमान व आर्द्रता. मशरूमचे प्रकार.काढणी बदल माहिती दिली,तर डॉ अंकित काळे यांनी मशरुमच्या विक्री व्यवस्थेबाबत माहिती सांगितली यावेळी मारोती जाधव यांनी कृषि व कृषि संलग्न योजना,ॲग्रीस्टॅक,पि एम किसान,शेततळे,जलतारा या बाबत माहिती सांगून सर्वांनी वरील योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय महारूद्र संस्थानचे अध्यक्ष आकाश शेंडे तर आभार वैभव काळे यांनी मानले,या वेळी उपस्थित समाज सेवक डि आर वानखडे, प्रगतशील शेतकरी राजेश भोवाळू ,आयुष ढोबळे तसेच मोठ्या प्रमाणात बचतगटांच्या महिला उपस्थित होत्या.