पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व दत्तापूर खरेदी विक्री संघाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात

माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप,खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द

धामणगाव रेल्वे :- राज्यात अतिवृष्टी व पुराचा लाखो हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान,नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व दत्तापूर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री संघाकडून मदतीचा धनादेश माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप,खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला.

        राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून अनेक गावांमध्ये पूर आले आहेत. त्यात सर्वाधिक फटका बळीराजाला बसला असून दुष्काळाच्या छायेखाली हतबल झालेले मराठवाड्यातील नागरिक व शेतकऱ्यांना धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व दत्तापूर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री संघाने मदतीचा हात पुढे केला आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी माजी आमदार प्रा.वीरेंद्र जगताप,खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आला.यात कृषी उत्पन्न बाजार समितीने एक लाख एकावन्न हजार रुपये व दत्तापूर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री संघाने एक लाख रुपये देऊन मदतीचा हात दिला आहे.जिल्हाधिकारी यांना धनादेश सुपूर्द करतेवेळी जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे,बाजार समितीच्या सभापती कविता गावंडे,उपसभापती संगिता गाडे,बाजार समितीचे संचालक 

राधेश्याम चांडक,दिनेश जगताप, रवी भुतडा,प्रमोद रोंघे, मंगेश बोबडे,संदीप दावेदार, देवरावजी बमनोटे, संदीप दावेदार, दिनेश जगताप, मुकुंद माहोरे, प्रशांत हुडे, गिरीष भुतडा,विपिन ठाकरे,सचिन सोमोसे,विलास भील,सुनील ठाकरे,चंदा निस्ताने,मेघा सबाने हे उपस्थित होते.तर दत्तापूर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बबनराव मांडवगणे,उपाध्यक्ष प्रदीप मुंदडा,नरेंद्र पाचबुद्धे,हेमंत कडू,मधुकर सावलकर,भाऊराव अडकणे,सुरेंद्र जयस्वाल,सुनील भोगे,संकेत उभाड,मुकेश राठी,मनोज वेरूळकर,डॉ. भगवंत शिंदे,शालिनी कोंबे,मालती पावडे व आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

———– 

नैसर्गिक आपत्तीने लाखो संसार पाण्यात बुडाले. मुसळधार पावसाने स्वप्नांचा चुराडा केला आहे.पूरग्रस्तांच्या संसार पुन्हा सावण्यासाठी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.या उद्देशाने धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती व दत्तापूर (धामणगाव) शेतकी खरेदी विक्री संघाकडून मदतीचा हात दिला आहे.

प्रा.वीरेंद्र जगताप,माजी आमदार धामणगाव विधानसभा मतदार संघ

—————–

राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या पूरग्रस्तांना मदत करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे.त्यामुळे संकटप्रसंगी मदतीचा हात देणे हे महत्वाचे आहे.

कविता श्रीकांत गावंडे,सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव रेल्वे

———

veer nayak

Google Ad