प्रा. पियुष अवथळे यांना ‘ आदर्श शिक्षक ‘ साहित्यरत्न पुरस्कार

0
93
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले

आर्वी : स्थानिक आर्वी येथील रहिवासी अवथळे यांना दादासाहेब गवई कनिष्ठ महाविद्यालय परतवाडा येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेले पियुष रमेशराव अवथळे यांना यावर्षीचा ‘ आदर्श शिक्षक ‘ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.

आर्वी येथील रहिवासी असलेले प्राध्यापक आपल्या अकाउंटिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात काम करून व विविध विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देऊन विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे आर्वीचे सुपुत्र पियुष र. अवथळे यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाबद्दल ए. डी. फाउंडेशन, सांगली महाराष्ट्र राज्यद्वारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ‘ आदर्श शिक्षक ‘ साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे.

ए. डी. फाउंडेशन सांगली, महाराष्ट्र राज्य रजिस्टर न. ११६/२०२४ यांच्या मार्फत संस्थेचे अध्यक्ष मा. अशोक श्रीपती गोरड सांगली यांच्या निवड समितीने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे. पियुष र. अवथळे यांनी ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना अकाउंटींग क्षेत्रामध्ये करियर संदर्भात मार्गदर्शन करत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या या सर्व केलेल्या कार्याची दाखल घेत त्यांना हा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सांगली येथे याच महिन्यात २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या एक भव्य पुरस्कार सोहळ्यामध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

veer nayak

Google Ad