आज जागतिक आदिवासी दिन, निसर्गाच्या सानिध्यात राहून आदिवासी बांधव आपल्या प्रथा-परंपरा जपतात. खऱ्या अर्थाने आपली संस्कृती जपण्याचा आणि निसर्गाने दिलेल्या नियमांवर चालण्याचा ते प्रयत्न करत असतात.
आज आपल्या दत्तापुर धामणगाव रेल्वे येथे आदिवासी बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी आमदार प्रतापदादा अडसड यांनी संवाद साधला व त्यांच्या आनंदात सामील झाले. आदिवासी बांधवांतर्फे आदिवासी दिनानिमित्त आयोजित शोभायात्रेत आमदार प्रतापदादा अडसड यांनी उपस्थिती दर्शवून त्यांच्या पारंपारिक नृत्यकलेमध्ये सहभाग दर्शविला.