चांदुर रेल्वे :- स्थानिक वनिता समाज द्वारा संचालित सरस्वती शिशु मंदिर आणि प्राथमिक शाळेचा स्नेहसमेलन कार्यक्रम नुकताच येथील संताबाई यादव मंगल कार्यालयात पार पडला त्यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या नृत्याविष्काराने प्रेक्षक व पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले असल्याचे पाहायला मिळाले, यावेळी बाहुलीचे लगीन या बालनाट्याचेही सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले होते.
दोन दिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून संस्थेचे अध्यक्ष सौ लता देशमुख विशेष निमंत्रिता मध्ये माजी गटशिक्षणाधिकारी मुरलीधर राजनीकर, संस्थेच्या अश्विनी देशमुख आधी मंचावर उपस्थित होते. यावेळी श्री राजनेकर यांचा सत्कार करण्यात आला त्या नंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर दुसऱ्या दिवशी बक्षीस समारंभ कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा लता देशमुख, विषय तज्ञ विवेक राऊत, मंगेश ऊल्हे माजी नगरसेवक सतपाल वरठे, तर नुकत्याच झालेल्या लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त केलेल्या शाळेच्या माजी विद्यार्थीनी राधा वऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता पाटील, संदीप देशमुख, अभिजित धकाते, निलेश इंगोले, वैभव केने, वैशाली देशमुख, अजुम पठाण, वर्षा दुधात, प्रीती उपाध्याय, नीना पोफळे, अंजली वाघ, ज्योती वणवे, अश्विनी हटवार, आरती ठाकरे, प्रतीक्षा पाणबुडे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे संचालन जया देशमुख यांनी केले.