प्राणीमित्र वन्यजीव रक्षक अक्षय रुपवणे विदर्भवीर पुरस्काराने सन्मानित

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगांव रेल्वे :- प्राणी मित्रासाठी एक भव्य दिव्य विदर्भवीर पुरस्कार 2026च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीवांच्या संवर्धन साठी रात्रंदिवस निस्वार्थी सेवा देणाऱ्या प्राणी मित्रांचा विदर्भवीर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.धामणगांव रेल्वे तालुक्यातील देवगाव येथील सर्पमित्र अक्षय रुपवणे यांना विदर्भ वीर 2026पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अक्षय रुपवणे हे हेगिंग वाईल्ड ऍडव्हेंचर. नेचर क्लब च्या माध्यमातून अनेक प्राण्यांना जीवनदान दिले आहे. यांची टीम गेल्या अनेक वर्षांपासून वन्य जीवांसाठी काम करतात. त्यांचे महत्व सांगतात.प्राण्यांचे संवर्धन करण्याच्या हेतूने शाळा, महाविद्यालय अनेक कार्यक्रमच्या माध्यमातून माहिती देणे. व वन्य प्राण्यांन विषयी अनेक उपक्रम राबविण्यात येते. त्यांना मिळालेल्या पुरस्काराने तालुक्यातून त्याच्यावर शुभेच्यांचा वर्षाव करण्यात येतं आहे.

veer nayak

Google Ad