आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : आज दिनांक 02-05-2025 रोज शुक्रवार ला मा.हरीश काळे साहेब तहसीलदार आर्वी यांच्या मार्फत मा.देवेंद्र फडवणीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. महात्मा फुले यांच्या जीवनावर “फुले ” चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु आर्वीतील व देश्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये अद्यापही लावल्या गेला नाही आहे. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट”छावा ” काही राज्यात टॅक्स फ्री करून संपूर्ण देशातील सिनेमागृहात दाखवल्या गेला होता परंतु महात्मा फुले जी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट “फुले ” त्या पद्धतीने प्रत्येक सिनेमागृहात दाखवल्या जात नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.महाराष्ट्रतील व भारत देशातील नागरिकांना दोन्ही महापुरुषांची कार्य व इतिहास माहिती झाला पाहिजे, पण असे दिसून येते की, महापुरुष वाटून देत आहे की काय, असे न होता सर्वच महापुरुष यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सशक्त मात्र म्हणून चित्रपट करमुक्त करून त्यांचा इतिहास हा प्रामुख्याने लोकांना माहित झाला पाहिजे. म्हणून छावा चित्रपत काही राज्यात टॅक्स फ्री करून भारतातील नागरिकांनी पाहिला त्याच पद्धतीने फुले चित्रपट टॅक्स फ्री करून संपूर्ण देशवासीयांना पाहता आला पाहिजे. करिता निवेदन सादर केले आहे.निवेदन करते गौतम अशोकराव कुंभारे, गजानन गायकवाड, सुनील खोरगडे, अनिल तायडे, मंगेश सरोदे, तेजस मनोहरे, शोभीत कुंभारे व आदर्श एकता सामाजिक संघटनेचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.