तालुका प्रतिनिधी
पाथरगाव येथील शेतकरी अरुण पुंडलिक गवई हे मागिल ४ दिवसापासून उपविभागीय कार्यालया समोर शेतातील वहिवाट रस्त्यासाठी आमरण उपोषणाला बसले असून आज माजी आमदार विरेन्द जगताप यांनी उपोषण मंडपाला भेट देत उपविभागीय अधिकारी यांच्याकडे शेतकऱ्याच्या मागणी करीता आक्रमक भूमिका घेत मुद्दा उपस्थित केला.
चांदुर रेल्वे तालुक्यातील पाथरगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अरुण पुंडलिक गवई यांनी आपल्या स्वतःच्या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे मला माझ्या शेतात जाण्यासाठी रस्ता देण्यात यावा या मागणीसाठी शुक्रवारपासून सुरू केलेले आमरण उपोषण आज उपोषणाचा चौथ्या दिवशी स्थानिक माजी आमदार विरेन्द जगताप यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन सदर विषय उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांच्याकडे मांडला परंतू प्रशासनातील अधिकारी या जल्वत मुद्दयावर लक्ष देत नसल्याने माजी आमदार जगताप आक्रमक झाले उपोषण कर्ता शेतकरीची प्रकृती खालावली आहे तरी चांदुर रेल्वे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, व इतर प्रशासकीय अधिकारी यांनी उपोषण मंडपाकडे पाठ फिरवीत असून मुद्दा निकाली काढत नाही सदर जमिनी वडीलोपार्जित असून पाथरगाव धरण होण्याआधी शेतात जाण्यासाठी वहिवाट रस्ता होता परंतु आता धरण झाल्यामुळे शेजारील शेतकऱ्यांनी आमचा शेतात येण्या जाण्याचा रस्ता बंद केला.त्यामुळे आम्हाला शेतातील इतर कामे करणे शक्य होत नसल्यामुळे आधी प्रशासनाने सुद्धा शेतकरी गवई यांच्या बाजूने निकाल दिलासा परंतु बाजूचे शेतकरी अपिल मध्ये गेल्यामुळे प्रशासनाने हा निर्णय बदलत शेतकरी गवई यांच्या विरुद्ध निकाल देत सदर वहिवाट रस्ता बंद केल्यामुळे शेतकरी अरुण पुंडलिक गवई यांच्यावर उपासमारीची वेळ आली तरी प्रशासनाने शेतकरीचा प्रश्न तातडीने सोडवावा स्थानिक सत्ताधारी आमदार यांचे शेतकऱ्याच्या मुद्दयावर लक्ष नसून प्रशासकीय अधिकारीवर वचक नाही म्हणून आज शेतकरी उपोषणास बसत आहे तरी मतदारसंघाची सध्या परिस्थिती दैनिय झाली असल्याचे मत जगताप यांनी व्यक्त केले यावेळी कृषी उत्पन्न बाजार सभापती जगदीश आरेकर,खरेदी विक्री अध्यक्ष गोविद देशमुख,कृउबास संचालक हरीभाऊ गवई राजेन्द्र राजनेकर,रूपेश पोलाद,नरेश स्थूल, इंद्रपाल बनसोड व अन्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते