धामणगाव रेल्वे प्रतिनिधी
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित व श्री. संत शंकर महाराज आश्रम द्वारा संचालित श्री संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय पिंपळखुटा येथे दिनांक 10/12/2024 रोजी चौथ्या व सहाव्या सत्रातील विद्यार्थ्यांचे पालकांची पालक सभा घेण्यात आली. पालक सभेला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे व्यवस्थापन समिती पदाधिकारी श्री राजू भाऊ भोगे ,प्राचार्य वृषाली देशमुख राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी, प्रा दीपक बोंद्रे पालक प्रतिनिधी सौ . बोथरा, सौ बांते श्री गिरडे व्यासपीठावर उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व परमहंस सद्गुरु श्री. संत शंकर महाराज तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांचे फोटोचे पूजन व हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आपले प्रास्ताविकामध्ये प्रा. दीपक बोंद्रे यांनी महाविद्यालयात चालणारे विविध उपक्रम, परीक्षा पद्धत, या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्राचार्य वृषाली देशमुख यांनी सर्व पालकांना आपले पाल्याचे शैक्षणिक प्रगती जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे ॲडव्हायजर व शिक्षण विभाग यांना कमीतकमी दर सहा महिन्यांनी भेटण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना वसतिगृह, महाविद्यालयाचे नियम पाळण्यास व नियमित महाविद्यालयात क्लासेस करण्यास तथा इतर कार्यक्रमांमध्ये सहभागासाठी प्रवृत्त करण्याचे आवाहन केले. यावेळी पालकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे श्री राजूभाऊ भोगे यांनी समाधान केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक बोंद्रे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. कल्याणी जाधव यांनी केले.