पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदनातून अनुजीव शास्त्रज्ञ प्रयोगशाळेची मागणी

0
5
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

 आर्वी : दि.1/4/2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट चे ओबीसी सेलचे विधानसभा अध्यक्ष नितीन आष्टीकर यांच्या नेतृत्वात तहसीलदार श्री हरिषजी काळे यांच्या मार्फत मा. श्री गुलाबराव पाटील ,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य यांना पाठविले निवेदन. निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की आर्वी शहरात नगर परिषद असून लोकसंख्या ही 50,000 च्या जवळपास आहे .शहरात 23 वार्ड आहे .तरी शुद्धा आर्वी शहरात पाणी पिण्या योग्य आहे की नाही हे चाचणी करता येत नाही. कारण आर्वी शहरात अनुजीव शास्त्रज्ञ प्रयोगशाळा नाही. आर्वी शहराला 12 किलोमीटर दूर देऊरवाडा येथून वर्धा नदीपत्रातून शहरात जलवाहिनीने पाणी आणण्यात येते. हे पाणी जाजूवाडी येथे शुद्धीकरण केल्यानंतर पुन्हा जलवाहिनीने पाणी शहरात पुरवठा केला जातो. शहरात जलवाहिनी बरेच नालीतून ,नाल्यातून ,किंवा नालीच्या बाजूने टाकण्यात आले असून याची देखरेख होत नाही त्यामुळे जलवाहिनी बरेच ठिकाणी फुटल्याने नालीतील दूषित पाणी किंवा पावसाचे पाणी जलवाहिनीत जाते तसेच जलवाहिनीतील पाणी पुरवठा बंद केल्याने गरुळ पाणी आत मध्ये प्रवेश करते.यामुळे शहरातील लोकांचा व लहान मुलांच्या आरोग्याला खूप मोठा धोका निर्माण होण्याचे चिन्ह आहे. बरेचदा जलवाहिनीतून फेसाळ ,गरुळ, हिरवा _पिवळा पाणी व ब्लिचिंग युक्त पाणी पुरवठा होतो. आर्वी शहरातील पंचायत समिती मध्ये आर्वी जवळील ग्रामीण गावाचे पाणीचे नमुने तपासणी, उपविभागीय प्रयोगशाळा आहे .या प्रयोगशाळेला आर्वी शहराचे पाणीचे नमुने तपासणीचे अधिकार देण्यात यावे. जेणे करून आर्वी शहरातील 23 वार्डातील पाणी पिण्यायोग्य आहे की नाही तसेच किती प्रमाणात शुद्ध आहे हे कळेल .तसेच फेसाळ, गरुळ, हिरवे _पिवळे व ब्लीचिंग मिश्रीत पाणी तपासल्यास आरोग्याला धोका होणार नाही. तसेच अशुद्ध पाणी पिण्यापासून होणारे बर्याच रोगराई पासून आर्वी शहरातील जनतेला मुक्तता मिळेल. निवेदनाच्या प्रतिलिपी मा. श्री अमर काळे खासदार वर्धा, मा. श्री दादारावजी केचे आमदार विधान परिषद, मा. श्री सुमित वानखेडे आमदार आर्वी विधानसभा क्षेत्र, मा. वान्मथी सी. जिल्हाधिकारी वर्धा, मा. श्री पंकज भोयर पालकमंत्री वर्धा जिल्हा यांना देण्यात आले आहे. निवेदन देते वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गट चे न्यालसिंग चव्हाण,शिरीष काळे तालुका अध्यक्ष, संजय देशमुख शहर अध्यक्ष, महेश बिरोले शहराध्यक्ष ओबीसी सेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

veer nayak

Google Ad