स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगांव रेल्वे तर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेत मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी व चांदूर रेल्वे येथील चिमुकल्या प्रतिभांचा कलाविष्कार.

0
49
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगांव रेल्वे, दि. 25 डिसेंबर 2025 : स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगांव रेल्वे यांच्या वतीने मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी व चांदूर रेल्वे येथे दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी 3 ते 10 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देणे, त्यांची सर्जनशील विचारशक्ती विकसित करणे व लहान वयापासूनच कलेविषयी आवड निर्माण करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता.

या कार्यक्रमाला शाळेच्या प्राचार्या प्रचिती धर्माधिकारी, प्री-प्रायमरी विभागप्रमुख शबाना खान तसेच श्रीकांत इंगडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. प्रशासन प्रमुख प्रितेश जुनवाडे व श्रीकांत निस्ताने यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उज्ज्वला गावंडे व सौरभ बोंद्रे यांनी प्रभावीपणे केले.
स्पर्धेत सहभागी झालेल्या चिमुकल्या कलाकारांनी रंगांच्या साहाय्याने आपल्या कल्पनांना कागदावर उतरवत निसर्ग, सामाजिक संदेश, सण-उत्सव व दैनंदिन जीवनाशी संबंधित विषय अतिशय आकर्षक पद्धतीने सादर केले. विद्यार्थ्यांचा उत्साह, आत्मविश्वास व मौलिकता पाहून उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.


स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे —

मंगरूळ दस्तगीर :
प्रथम क्रमांक – कार्तिकी मारोडकर
द्वितीय क्रमांक – झोया हुसैन
तृतीय क्रमांक – पार्थ लाहबर

अंजनसिंगी :
प्रथम क्रमांक – प्रियाल बागडे
द्वितीय क्रमांक – ऐतक्षिणी टेंभरे
तृतीय क्रमांक – लावण्या मेश्राम
सांत्वन पुरस्कार – आनंदी टेंभरे

चांदूर रेल्वे :
प्रथम क्रमांक – ओवी मोहा
द्वितीय क्रमांक – तनुश्री ढोक
तृतीय क्रमांक – तक्ष खरकटे

सांत्वन पुरस्कार – स्वानंदी तांबसकर, अमायरा दीक्षित, देवांश धुमाले, यशस्वी विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे व प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे मुलांमध्ये सर्जनशीलता, एकाग्रता, सूक्ष्म कौशल्ये व आत्म-अभिव्यक्ती विकसित होते. लहान वयात कलेशी जोडले जाणे हे मुलांच्या मानसिक व भावनिक विकासासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

आयोजकांनी नमूद केले की, अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निरोगी स्पर्धा, शिस्त व आत्मविश्वास निर्माण होतो. उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचे भरभरून कौतुक करत भविष्यातही अशा कार्यक्रमांचे सातत्य राखावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा व प्रोत्साहन देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या यशस्वी आयोजनातून कला आधारित उपक्रम हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी किती महत्त्वाचे आहेत, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

veer nayak

Google Ad