से. फ.ला. विद्यालयात योग शिबिराचे आयोजन

0
26
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे – तालुका प्रतिनिधी

धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फतेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात दिनांक- 22 ते 24 एप्रिल या तीन दिवसीय “योग शिबिराचे” आयोजन करण्यात आले आहे.. हे योग शिबिर सकाळी 6 ते 7: 20 या कालावधीत घेण्यात येत आहे.. या योग शिबिराला इयत्ता पाच ते दहावी च्या कित्येक विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. या योग शिबिराला विद्यालयाचे प्राचार्य प्रशांत शेंडे , उपप्राचार्य गोपाल मुंधडा , पर्यवेक्षक प्रा. प्रदीप मानकर व विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे सुद्धा उपस्थित होते.

आज धकाधकीच्या युगात प्रत्येकाचे वेळेअभावी आपल्या शरीराकडे दुर्लक्ष होत आहे परंतु आपले शरीर निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी व्यायामाची नितांत गरज आहे या अनुषंगानेच विद्यालयात योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यालयाचे शारीरिक शिक्षक सौरभ पांडेय यांनी सूक्ष्म शारीरिक व्यायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. शारीरिक शिक्षक सौरभ पांडेय यांनी योगासनाचे महत्त्व तसेच फायदे आपल्या प्रात्यक्षिकांमधून समजावून दिले. त्यांनी योगासनाचे विविध आसन ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन, पद्मासन, वज्रासन, योगमुद्रा, धनुरासन, भुजंगासन, वक्रासन अशा विविध आसनांचे योग्यरीत्या मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले व सर्व विद्यार्थी व शिक्षकांकडून योग्यरित्या करून घेतले.

 तसेच विद्यालयाचे शारीरिक शिक्षक शोभेराम जावरकर यांनी प्राणायामाचे महत्त्व व फायदे आपल्या प्रात्यक्षिकांमधून समजावून दिले. तसेच शेवटी “हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे”या गीताने समारोप करण्यात आला.या योग शिबिराला विद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयाचे सर्व विद्यार्थी यांनी या सर्व व्यायाम प्रकारांना भरभरून प्रतिसाद दिला..

दिनांक – 22 एप्रिल 2024

veer nayak

Google Ad