शुक्रवारी धामणगाव शहरात श्री परशुराम जन्मोत्सव निमित्य विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन

0
53
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे,

अखिल भारतीय ब्राह्मण सभा, शाखा धामणगाव रेल्वे च्या वतीने  दिनांक १० मे शुक्रवारला श्री परशुराम जन्मोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

अक्षय तृतीयेला भगवान परशुरामजींच्या जन्मोत्सवानिमित्त धामणगाव शहरात श्री परशुराम जन्मोत्सव समिती तर्फे टिळक चौकातील श्री मारोती देवस्थान येथे सकाळी ९ वाजता श्री परशुरामजींच्या मूर्ती चे पूजन व आरती तसेच दुपारी १२ ते ४ श्री महावीर भवन मुख्य बाजार ओळ येथे  श्री परशुराम महिला मंडळ द्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून सायंकाळी ७ वाजता याच ठिकाणी भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आलेली आहे.सोबतच प्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे.धामणगाव नगरीतील तसेच परिसरातील समाज  बंधू-भगिनींनी भगवान परशुरामजींच्या जन्मोत्सव निमित्त आयोजित धार्मिक,अध्यात्मिक कार्यक्रमांना उपस्थित रहावे असे आवाहन श्री परशुराम जन्मोत्सव समिती, अखिल भारतीय ब्राह्मण सभा धामणगाव रेल्वेच्या वतीने करण्यात आलेले आहे

veer nayak

Google Ad