तालुका प्रतिनिधी/
धामणगाव रेल्वे :— धामणगाव रेल्वे तालुक्यातील सुप्रसिद्ध व शिक्षणाच्या बाबतीत आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी धामणगाव एज्युकेशन सोसायटीची एक भाग म्हणून श्री धापुदेवी भट्टड इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल धामणगाव रेल्वे येथे नवरात्री दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून प्री प्रायमरी स्कूल मध्ये K. G ll लोटस व मोगरा मुलींचे देवीची वेशभूषा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमांमध्ये k. G ll च्या मोगरा व लोटस या विभागातील मुलींनी नवरात्र कार्यक्रमानिमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या आणि अतिशय सुंदर अशी देवीची वेशभूषा करून आपली स्पीच तयार करून मांडली होती. .अशा या कार्यक्रमामुळे श्री धापुदेवी भट्टड इंग्लिश मीडियम प्री प्रायमरी स्कूल मधील संपूर्ण वातावरण हे भक्ती मय झालेले होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शाळेतील व्यवस्थापक व शिक्षक व इतर कर्मचारी यांनी आपल्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला आहे.