ग्राम वाठोडा बू. येथील सार्वजनिक चौकामध्ये सामूहिक सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन…

0
45
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक 28/02/2026 सायंकाळी 6 वाजता ग्रामपंचायत, प्रांगण वाठोडा बू.. येथे श्री गुरुदेव तालुका समिती व श्री गुरुदेव सेवा मंडळ वाठोडा यांच्या संयुक्त विद्यमानाने सामूहिक सामुदायिक प्रार्थनेचे भव्य आयोजन करण्यात आले. या प्रार्थनेच्या माध्यमातून महापुरुषांचे विचार हे जनगनापर्यंत पोहोचावे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून श्री गुरुदेव सेवा समिती धामणगाव रेल्वे यांनी हा उपक्रम गावागावांमध्ये चौका चौकामध्ये साजरा करण्याचे ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून वाठोडा गावामध्ये सामुदायिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. प्रार्थनेच्या माध्यमातून गावामध्ये सर्वधर्मसमभाव, ग्राम संघटन, ग्राम शुद्धी, व्यसनमुक्ती, स्वच्छता, सुसंस्कार अशा विविध मुद्द्यांवर या प्रार्थनेच्या माध्यमातून प्रबोधनात्मक विचार कोरले गेले.

सामुदायिक प्रार्थनेच्या अनुषंगाने या ठिकाणी गावामध्ये सेवा देणारे सर्व माजी सरपंच यांचे सत्कार करण्यात आले तसेच गावांमधील सर्व दिवंगत व स्व. चिरंजीव श्रवण कोरडे यांना मौन श्रद्धांजली देण्यात आली.

या कार्यक्रमाकरिता गावातील तसेच आजूबाजूच्या गावातील बाल, गोपाळ, युवक, युवती, तरुण, वृद्ध पुरुष, व महिला मंडळीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच श्री गुरुदेव तालुका समिती मधील विठ्ठलदादा काठोळे, रमेशराव ठाकरे, दीपक इंगळे, रवी चौधरी, गजानन भेंडे, गजानन ठाकरे, निलेश मोहकर ,प्रशांत टांगले, गोपाळ काका, नारायणज ठाकरे, बंडू जुनघरे सर्व उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाठोडा येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व सदस्यांनी अथांग प्रयत्न केले. यामध्ये श्री किशोर सावंत, अरुणराव गरड, प्रशांत सावंत, जीवन बुगल, आशिष सावंत, अक्षय गायकवाड, पवन सावंत, व सुसंस्कार शिबिरातील मुले, तसेच गावातील इतरही मंडळी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad