धामणगाव रेल्वे : स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये ;गुड टच आणि बॅड टच; या कार्यशाळेचे आयोजन.

0
96
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी ;गुड टच आणि बॅड टच; या विषयावर महत्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षा शाळेच्या प्राचार्या
प्रचिती धर्माधिकारी, एस. ओ. एस. कब्सच्या पर्यवेक्षिका शबाना खान आणि प्रमुख अतिथी म्हणून डॉ. प्रज्ञा पाटील एम.डी., आयुर्वेद विद्यालय , सोबतच शाळेतील सर्व शिक्षकगण उपस्थित होते. डॉ. प्रज्ञा
पाटील गेल्या १४ वर्षांपासून एम.डी. पदावर कार्यरत आहेत. बालकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत तज्ज्ञ म्हणून त्यांनी महत्वपूर्ण माहिती दिली.

वर्ग पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना सहज समजेल अशा भाषेत गुड टच आणि बॅड टच यातील फरक स्पष्ट केला. यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्या शरीराच्या महत्त्वपूर्ण भागांविषयी आणि त्यांना स्वतःची सुरक्षा कशी राखावी याची माहिती देण्यात आली.

डॉ. प्रज्ञा पाटील यांनी आपल्या भाषणात मुलांना स्वतःच्या शरीराचा आदर करण्याचे महत्त्व समजावले. त्यांनी सांगितले की, मुलांनी गुड टच आणि बॅड टच ओळखणे हे अत्यंत गरजेचे आहे, आणि त्यासाठी
पालकांनी आपल्या मुलांना माहिती द्यावी असे त्यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना पटवून दिले. तसेच शाळेच्या प्राचार्य प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करून जागृत
केले.

शाळेतील या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, त्यांच्या सुरक्षिततेबाबत सजगता वाढली आहे. पालकांनाही या कार्यशाळेतून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आणि अशा प्रकारच्या
कार्यक्रमांनी मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, असे मत व्यक्त केले.

veer nayak

Google Ad