धामणगाव रेल्वे,
कोलकत्ता येथे ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरचा क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा निषेध नोंदवून शनिवारी इंडियन मेडिकल असोसिएशन,निमा (एन आय एम ए) तसेच धामणगाव मेडिकल असोसिएशन तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर अशोक भैया यांच्या नेतृत्वात डॉ. प्रकाश राठी, डॉ. अशोक सकलेच्या, डॉ. असित पसारी, डॉ. भरत पालीवाल, डॉ.आकाश येंडे, डॉ. सागर राऊत, डॉ. अमित गुल्हाने, डॉ. बोरगे, डॉ. टोकसे, डॉ. गुप्ता डॉ.पवन शर्मा डॉ. राजेश वाटाणे यांनी संयुक्तपणे ठाणेदार ताथोड यांना निवेदन दिलेत
घटनेच्या निषेधार्थ शनिवारी सर्व डॉक्टरांनी हॉस्पिटल सुद्धा बंद ठेवलेत
……………………………………..
डॉक्टरांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा कायम राहावी…डॉ.भैया
डॉक्टर हा समाजातील सेवा करणारा प्रमुख घटक आहे आपल्या जीवाची परवा न करता तो रुग्णांची सेवा करतो परंतु अशा डॉक्टरांना नेहमीच शारीरिक, मानसिक त्रास सहन करावा लागतो अनेक वेळा अन्याय अत्याचार डॉक्टरांवर होतात डॉक्टरांच्या हॉस्पिटलची तोडफोड देखील केली जाते त्यामुळे डॉक्टरांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा कायम राहावी अशी मागणी सुद्धा यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक भैया यांनी केली
—————————————————
डॉक्टरांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे कोलकत्ता येथे एका तरुण पोस्ट ग्रॅज्युएट चेस्ट मेडिसिनच्या विद्यार्थिनीचा ड्युटीवर असताना क्रूरपणे बलात्कार करून हत्या करण्यात आली या गुन्ह्याच्या तपासात कॉलेज प्रशासन आणि पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे पोलीस आणि प्रशासन प्रामाणिकपणे तपास सुरू ठेवण्यास अयशस्वी ठरले आहेत महाविद्यालय प्रशासन व पोलीस यांच्या संघटने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचे कोलकत्ता उच्च न्यायालयाने राज्य पोलिसांना आदेश देऊन या प्रकरणाची जबाबदारी सीबीआयला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले आहेत तसेच १५ ऑगस्ट ला याच आर जी कार मेडिकल कॉलेजवर मोर्चा काढून एका जमावाने तोडफोड केली आणि आंदोलन करणाऱ्या वैद्यकीय विद्यार्थ्यांवर हल्ला केला तसेच जमावाने जागेची ही तोडफोड करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे














