धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघांमध्ये विपश्यना केंद्र उभारण्यात यावं याकरिता आमदार प्रतापदादा अडसड यांनी वारंवार मागणी केली असून येणाऱ्या कार्यकाळामध्ये लवकरच धामणगाव रेल्वे मतदारसंघांमध्ये विपश्यना केंद्र उभारण्यात येईल.- श्री.देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील संत बेंडोजी महाराज संस्थान हे संपूर्ण महाराष्ट्रात भाविकांच्या श्रद्धेच स्थान असून गेल्या कित्येक वर्षांमध्ये पर्यटन आराखड्यामध्ये हे समाविष्ट केल्या गेले आहे. परंतु अद्यापही या संस्थानाचा विकास न झाल्याने यासंदर्भात शासनाकडून तातडीने मदत करण्यासंदर्भात आमदार प्रतापदादा अडसड यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून लवकरच येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपण यामध्ये भरघोस असा निधी उपलब्ध करून या संस्थांनाचे व घुईखेड गावाचे वैभव उदयास आणू.- श्री. देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वर्धा व अमरावती जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवरील विटाळा येथील पुलाची मागणी प्रताप दादा अडसड यांनी केली असून लवकरच येणाऱ्या काळात ती सुद्धा पूर्ण करण्यात येईल. -श्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघातील अभूतपूर्व अशा कोट्यावधी रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याच्या अनुषंगाने आमदार प्रतापदादा अडसड यांच्या अथक पाठपुराव्याने मतदारसंघातील उल्लेखनीय परिवर्तन तसेच जनतेप्रती आमदार प्रतापदादा अडसड यांची एकनिष्ठा आणि समर्पणाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांनी प्रेरणादायी गौरवोद्गार आमदार प्रतापदादा अडसड यांचे यावेळी केले. मा. देवेंद्रजींचे विकासाभिमुख नेतृत्व, दूरदृष्टी आणि मार्गदर्शनामुळेच भूमिपूजन झालेल्या योजनेच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली, याबद्दल आमदार प्रतापदादा अडसड यांनी देखील त्यांचे विशेष आभार व्यक्त केले.