राष्ट्रसंत सेवा गौरव पुरस्काराने निलेश मोहकार सन्मानि

0
2
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोला यांच्या वतीने भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षा निमित्त ११ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनामध्ये श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते युवा नेतृत्व ग्रामगीताचार्य निलेश मोहकार यांना प्रचार कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव लहानपणापासून होऊन समाजसेवेने भारावलेले व राष्ट्रसंतांच्या विचाराने कृतीशील कार्य करणारे धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथील ग्रामगीताचार्य निलेश मोहकार होय. गेल्या १५ वर्षांपासून अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या तत्व प्रणालीनुसार चालणाऱ्या धामणगाव रेल्वे येथिल श्रीगुरुदेव सुसंस्कार शिबिरामध्ये मुख्य शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या बाल मनावर सुसंस्काराचे धडे गिरवतात. तसेच राष्ट्रधर्म प्रचार समिती व राष्ट्रधर्म युवा मंच महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून चालणाऱ्या संस्कार शिबिरात बौद्धिक शिक्षक म्हणून सेवा देतात. वृक्षारोपण,ग्रामस्वच्छता अभियान, रक्तदान इत्यादी सामाजिक उपक्रमात नेहमी सहभाग घेतात. सामाजिक कार्याची आवड मनामध्ये घेऊन व राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा म्हणून कीर्तन-व्याख्यानाच्या माध्यमातून गावो-गावी समाजप्रबोधन करतात. वरील प्रचार कार्यातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल अकोला येथे ११ वे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलना मध्ये आचार्य श्री हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, संमेलनाध्यक्ष श्री श्यामसुंदरजी सोन्नर, स्वागताध्यक्ष श्री मंगेशदादा कराळे, डॉ.गजानन नारे यांच्या हस्ते व डॉ.रामेश्वर बरगट , डॉ.भाष्करराव विघे, श्री ज्ञानेश्वरराव रक्षक, श्री नामदेवराव गव्हाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामगीताचार्य निलेश मोहकार यांना ‘राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा गौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.

आपल्या पुरस्काराचे श्रेय निलेश ने आई-वडील, बंधू, गुरुजन व श्रीगुरुदेव तालुका समिती धामणगाव रेल्वे यांना दिले आहे.निलेश मोहकार यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल श्री गोपालजी भूत, सौ.राधामाई भूत, श्री काठोडे गुरुजी, श्री रमेशराव ठाकरे गुरुजी, श्री दिपकराव इंगळे, श्री रविभाऊ चौधरी,श्री प्रफुल सावंत व श्रीगुरुदेव मित्र परिवार यांचेसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

veer nayak

Google Ad