दाभाडा : समाजातील संवेदनशील मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यासाठी दाभाडा येथील सुहास ठोसर यांनी भंडारा जिल्ह्यातील प्रतिभावान कलाकारांना सहभागी करून ‘शेतकऱ्याची आत्महत्या’ या आशयपूर्ण लघुपटाची निर्मिती केली आहे.

शेतीची वाढती खर्चिकता, बाजारभावातील अस्थिरता आणि कर्जाचे वाढते ओझे या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या या लघुपटातून शेतकऱ्यांच्या व्यथा अत्यंत प्रभावीपणे मांडण्यात आल्या आहेत. सुहास ठोसर यांचा हा प्रयत्न समाजातील प्रत्येक घटकाला विचार करायला लावणारा ठरणार आहे.
लवकरच हा लघुपट विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणार असून प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















