राजर्षी शाहू विज्ञान महाविद्यालय, चांदूर रेल्वे येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम महाविद्यालयाच्या समान संधी कक्ष यांच्या वतीने दि. २३ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. याप्रसंगी डॉ. एस. पी. पाथरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्याख्यान दिले. आपल्या व्याख्यानात त्यांनी नेताजींचे देशभक्तीपर विचार,स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, त्याग, शौर्य व नेतृत्वगुण यावर सविस्तर प्रकाश टाकला. नेताजींचे “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आज़ादी दूँगा” हे उद्गार आजच्या तरुण पिढीसाठी किती प्रेरणादायी आहेत, हे त्यांनी प्रभावीपणे स्पष्ट केले.
व्याख्यानानंतर,बी.एस्सी.विद्यार्थ्यांसाठी गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. या गटचर्चेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी नेताजींच्या विचारांवर, राष्ट्रभक्ती, स्वावलंबन, शिस्त आणि आजच्या युवकांची भूमिका यावर आपली मते मांडली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, विचार मांडण्याची क्षमता आणि संघभावना वाढीस लागली. संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. पी. आर. सरदार यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. आर. वडनेरकर त्यांनी आपल्या भाषणात अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय जाणीव जागृत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

















