अग्निशामक दलामुळे इतर लागून असलेले दुकाने थोडक्यात बचावले
नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने इतर दुकाने वाचवीण्यास कसोटीने घेतली मेहनत
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : नेहरू मार्केट येथील सकाळी ९ वाजताच्या दरम्यान काही दुकानदार दुकान उघडण्याकरिता आले असता काही कपड्याच्या दुकानातून धुळ निघत असल्याचे दिसत होते. तसेच परिसरातील सर्व दुकानदारांना सूचना देऊन दुकानदारांना बोलावून माल काढण्याचा प्रयत्न केला परंतु आगीने आतून चांगलीच पेट पकडल्याने चांगलीच खळबळ उडाली नेहरू मार्केटमध्ये कपड्याच्या दुकानांना आग लागल्याची माहिती नगरपरिषद अग्निशामक दलाला देण्यात आली तसेच आर्वी येथील अग्निशामक दलाच्या दोन्ही गाड्या प्राचारन करून ही आग विझवण्याचे काम सुरू केले तरी सुद्धा आग आटोक्यात येत नसल्याने आष्टी व पुलगाव येथील अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावून आगीला आटोक्यात आणले मात्र आग विजवेपर्यंत चार दुकानातील माल जळून खाक झाला होता.
यामध्ये रवी लालवानी यांचा पाण ठेला व डेलीनीट्सचे दुकान, घनश्याम लालवानी यांचे लक्ष्मी बुक डेपो, एडवोकेट गुरुनासिंघानी यांचे ऑफिस, रजा मेन्स वेअर, यांच्या दुकानातील फर्निचर सह माल जळाल्याने लाखोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लागून असलेले दोन दुकान थोडक्यात बचावले माल काढण्याची संधी मिळाली मात्र काही फर्निचर जळून खाक झाल्याने लाखोचे नुकसान झाले आहे.
रवी लालवानी यांच्या दुकानाला लागून असलेल्या मनुजा टेलर मटेरियल यांच्या दुकानाचे काही फर्निचरचे काम सुरू होते. त्यांच्या दुकानात माल नसल्याने ते थोडक्यात बचावले दुकानातील माल काढण्याकरिता सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला सामाजिक बांधिलकीतून मदतीचा हात यावेळी आर्वीचे ठाणेदार सतीश डेहनकर व नगरपरिषद मुख्य अधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांच्या मार्गदर्शनात सर्व कर्मचाऱ्यांनी अग्निशामक दल व इतर यंत्रणेच्या माध्यमातून मदत करून इतर दुकानदारांना वाचवण्यास सहकार्य केले. दुकानदाराचे झालेल्या नुकसानीचे पुढील तपास पोलीस व संबंधित अधिकारी करीत आहे.