नेहरू मार्केट मधील चोरी प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी ताब्यात आर्वी गुन्हे शाखा पथकाची कारवाई

0
1509
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी येथील नेहरू मार्केट मधील 11 दुकान फोडणारे 3 अट्टल चोरटे अटक 2 अजूनही फरार

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : नेहरु मार्केट परिसरातील आर्वी येथील 11 दुकाने फोडुन चोरी केल्याचा गुन्हा अखेर गुन्हे शाखा पथक आर्वी पोलीसांनी केला उघड एक महीना आधी आर्वी शहरात तब्बल 11 दुकाने फोडून या चोरट्यांनी व्यापारी वर्गामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते.
पोलीस स्टेशन आर्वी जिल्हा वर्धा येथे दिनांक 08/02/2025 चे 23.00 वा ते दिनांक 09/02/25 चे 05.00 दरम्यान नेहरु मार्केट आर्वी येथील मार्केट परीसरात एकुन 11 दुकानाचे शटर फोडुन आत मध्ये प्रवेश करुन दुकानातील काउंट्टर मधील (गल्ला) मध्ये ठेवलेली नगदी एकुन रक्कम 2,15,000/- व एक सोन्याचा चैन 8 ग्राम वजनाची किमंत 40,000/- रु असा एकुन 2,55,000/- रु मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला होता. अशा वरून आर्वी येथील व्यापारी बांधवांच्या फिर्यादवरुन दिनांक 09/02/2025 रोजी अपराध क्रमांक 122/2025 कलम 331(4), 305 (अ),3(5) BNS अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.


सदर गुन्हा तपासावर असतांना मुखबीर कडुन मिळालेल्या माहीती वरुन आरोपी नामे (1) मन अशोक चवरे वय 19 वर्ष रा. अमन नगर वस्ती वानाडोंगरी रोड नागपुर, (2) अमन उर्फ बिट्द्या उर्फ वनसाईड संजय मेश्राम वय 25 वर्षे रा. राष्ट्रीय झेंड्या जवळ रामबाग नागपुर, (3) प्रणय उर्फ पण्या विनोद मेश्राम वय 19 वर्षे रा. गल्ली नं. 16 कौशल्यानगर नागपुर जिल्हा नागपुर यांना ताब्यात घेऊन त्यांना विश्वासात घेऊन सखोल विचारपुस केली असता नमुद आरोपीतांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यातील दुकान फोडुन चोरी केलेली रोख रक्कम गुन्ह्यातील नमुद अटक आरोपी नामे (1) मन अशोक चवरे वय 19 वर्ष रा. अमन नगर वस्ती वानाडोंगरी रोड नागपुर, (2) अमन उर्फ बिट्या उर्फ वनसाईड संजय मेश्राम वय 25 वर्षे रा. राष्ट्रीय झेंड्या जवळ रामबाग नागपुर, (3) प्रणय उर्फ पण्या विनोद मेश्राम वय 19 वर्षे रा. गल्ली नं. 16 कौशल्यानगर नागपुर जिल्हा नागपुर यांचे ताब्यातुन पुराव्याकामी पंचासमक्ष जप्त केलेली आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. सागर कवडे साहेब, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री. देवराव खंडेराव साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन आर्वी ठाणेदार मा. पो.नि. सतिश डेहनकर साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो.उप.नि. सर्वेश बेलसरे, पोलीस अमंलदार योगेश चन्ने, अमर हजारे, डिगांबर रुईकर, अंकुश निचत, प्रवीन सदावर्ते, अमोल गोरटे, निलेश करडे, स्वप्नील निखुरे यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात सुरु आहे. तसेच आणखी दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

veer nayak

Google Ad