श्री संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे द्वारे दत्त ग्राम शिदोडी येथे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरामध्ये भव्य नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न.

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

(धामणगाव रेल्वे प्रतिनिधी) 

डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नित व श्री संत शंकर महाराज आश्रम ट्रस्ट द्वारा संचालित श्री. संत शंकर महाराज कृषी महाविद्यालय पिंपळखुटा यांचे विशेष श्रमसंस्कार शिबिर “youth for my Bharat Youth for digital Literacy ” या तीन द्वारे दत्ता ग्राम शिदोडी येथे दिनांक ७/१/२०२५ ते १३/१/२०२५ दरम्यान संपन्न होत आहे यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच ग्राम शिदोरी येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिरामध्ये नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन महात्मे नेत्र रुग्णालय, अमरावती द्वारा घेण्यात आले तारादेवी मंदिर शिदोडी परिसरात हे शिबिर घेण्यात आले यामध्ये एकूण ४० शिबिराची ,६ कर्मचारी आणि ७१ गावकरी असे एकूण ११६ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली व १२ रुग्णांना नेत्र तपासणी करून पुढील मोतीबिंदू ऑपरेशन साठी अमरावती हॉस्पिटलला पाठविण्याचे ठरले. 

यावेळी महात्मे आय हॉस्पिटलअमरावती येथील डॉ.झनक बिसेन ,शुभम नाकाडे,हुझेफा सहभागी झाले होते. 

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी शिदोडी ग्राम सरपंच सौ करिष्मा ताई शिवरकर, उपसरपंच रितेश जी निस्ताने, पोलीस पाटील सौ. संजीवनी ताई निस्ताने, महाविद्यालयाचे अध्यक्ष नंदूशेठ चव्हाण, राजूभाऊ भोगे, एडवोकेट प्रकाशराव देशमुख, प्राचार्य वृषाली देशमुख, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. दीपक बोंद्रे, पवन शिवनकर, प्रा. मनीषा लांडे, सौ एकता गंथडे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शिबिरार्थी व शिदोडी येथील ग्रामस्थांचे अमूल्य सहकार्य लाभले.

veer nayak

Google Ad