राष्ट्रीय स्तरावरील प्रतिभावान सन्मान “राष्ट्रगौरव पुरस्काराने सौ.राखी मेश्राम सुरजूसे सन्मानित

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

– अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलन यावर्षी भारतातून महाराष्ट्रातील अमरावती येथे घेण्यात आले,भारत सरकार मंत्रालयातर्फे संलग्नित असलेली “रेडियंट बुक ऑफ रेकॉर्डस् व ज्ञानोदय फाउंडेशन दिल्ली येथील संस्थेतर्फे दरवर्षी भारतातील अतुलनीय व्यक्तींना सन्मानित करण्यात येते.यावर्षी हा कार्यक्रम अमरावती येथे घेण्यात आला.त्यात भारतातून मूळच्या अमरावती येथील सौ राखी मेश्राम सुरजूसे यांना नृत्य,कला व सांस्कृतिक क्षेत्रात अतिशय मानाचा “राष्ट्रगौरव पुरस्काराने”सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे वंशज सुभेदार कुणाल मालुसरे,पंढरीनाथ रोकडे संचालक मोरेश्वर महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर, डॉक्टर गुरुतेज सिंह ब्रार (कॅनडा)भटिंडा, डॉक्टर सुनील साळवे, क्रांती महाजन, नरेशचंद्र काठोळे, सुधीर महाजन यांच्या हस्ते सौ राखी यांना “राष्ट्र गौरव”पुरस्कार बहाल करण्यात आला. नृत्य कला व सांस्कृतिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. या अगोदरही माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते त्यांना नृत्य व कला क्षेत्रात विशेष कला पुरस्कार देण्यात आला होता. फिल्म सोसायटी पुरस्कार, राज्यकला गौरव,राज्य भूषण, असे अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

त्यांनी ई टीव्ही वाहिनीवरील, क्राइम डायरी, सोनी चैनल वरील क्राइम पेट्रोल यासह अनेक अल्बम व मालिकांमध्ये काम केले असून २००७ साली अभिनेत्री सोनाली बेंद्रे संचालित “क्या मस्ती क्या धूम” या स्टार प्लस वाहिनी वरील डान्स प्रोग्राम मध्ये प्रथम क्रमांक मिळवला, मागील वर्षी त्यांना पद्मश्री स्वर्गीय सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ताई सपकाळ यांच्या हस्ते “राज्य कलाविष्कार पुरस्काराने अहिल्यानगर येथे गौरविण्यात आले. छत्रपती शिवराय व त्यांचा इतिहास अभूतपूर्व आहे,

गड आला पण सिंह गेला, असे सरसेनापती तानाजी मालुसरे यांच्या वंशाच्या हातून मला पुरस्कार मिळणे हे माझे भाग्यच आहे. माझ्या यशाचे श्रेय माझ्या आई-वडिलांना तसेच प्रत्येक सुखदुःखात सोबत असणारे माझे पती श्री. धीरज नामदेवराव सुरजूसे यांना देते असे त्यावेळी राखी मेश्राम सुरजूसे यांनी सांगितले. पुरस्कार हे आपल्या क्षेत्रात आणखी पुढे जाण्याची प्रेरणा देतात, समाजाचाही मोठा वाटा असतो. राष्ट्रीय स्तरावरील हा प्रतिभावान पुरस्कार सौ राखी मेश्राम सुरजुसे यांना मिळाल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

veer nayak

Google Ad