धामणगाव रेल्वे,
सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल येथील सेवानिवृत्त शिक्षक व धामणगाव शहरातील अनेकांचे जुन्या काळातील गुरु तसेच अभय आणि आनंद देशपांडे यांचे वडील श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर, कृष्णा नगर येथील ट्रस्टी दत्तात्रय देशपांडे यांचे काका नारायणराव देशपांडे यांचे रविवारी सायंकाळी निधन झाले.
त्यांचे मागे पत्नी दोन मुलं दोन मुली आप्तपरिवार असून त्यांची अंत्ययात्रा आज सोमवारला सकाळी ११ वाजता त्यांचे निवासस्थान पोलीस स्टेशन समोर स्व. पुरुषोत्तमदास राठी नगर येथून निघेल.