‘मेयो’ व ‘मेडिकल’मधील वैद्यकीय सेवा सुविधा वाढाव्यात व अधिकाधिक गरजू रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपये निधी येथील कामांना उपलब्ध करून दिला आहे. ही कामे दिलेल्या कालमर्यादेत व आराखड्यानुसार पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण दटके, मोहन मते, आशीष देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव दिनेश वाघमारे, महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, , वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ अजय चंदनवाले, अधिष्ठाता डॉ. रवी चव्हाण, डॉ. राज गजभिये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.