लायन्स क्लब जागतिक सेवा सप्ताह धामणगाव रेल्वे
लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ एच १ च्या वतीने जागतिक सेवा सप्ताह पुरस्कारात नागपूरच्या ग्रीन सिटी,नागपूर आयुर्वेद, नागपूर अमेज, नागपूर साउथ, अमरावती प्रीमियम व अमरावतीच्या लायन्स क्लब प्राईड ने सर्वोत्कृष्ट पुरस्कार घेऊन बाजी मारली
दरवर्षी लायन्स क्लबच्या वतीने २२१ देशांमध्ये २ ते ८ ऑक्टोंबर पर्यंत जागतिक सेवा सप्ताहात सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, महिला शक्ती बळकटीकरण पर्यावरण सह असे विविध बाबीवर उपक्रम राबविण्यात येते विदर्भातील आठ जिल्ह्यातील ५६ लायन्स क्लब तसेच सहा लिओ क्लब सदस्यांच्या पुरस्कार वितरण सोहळा पहिल्यांदा धामणगाव सारख्या तालुका स्तरावर घेण्यात आला यात सर्व जिल्ह्यातील PDG सह १०६ कॅबिनेट ऑफिसर व ३०४ सदस्य उपस्थित होते
आरोही लॉन येथे प्रांत सेवा सप्ताह प्रमुख लॉ .विलास बुटले यांच्या पुढाकाराने आयोजित या ऐतिहासिक कार्यक्रमात पूर्व प्रांतपाल विनोद वर्मा, प्रांतपाल लॉ .डॉ. रिपल राणे, उपप्रांतपाल लॉ विलास साखरे लिओ क्लब चे प्रांत सभापती लॉ .अभिषेक बुटले प्रांत लॉ अजय सिंग प्रांत कोष्याध्यक्ष लॉ दीपक चव्हाण यांच्या उपस्थितीत सेवा सप्ताह प्रमुख लॉ विलास बुटले व सुवर्णा बुटले यांच्या हस्ते २६८ जणांना मानाचे पुरस्कार देण्यात आले
तत्पूर्वी विदर्भातून आलेल्या पुरस्कार मानकऱ्याचे पंजाबी ढोल या गजरात औक्षवण करून स्वागत करण्यात आले
येथे दुपारी झालेल्या प्रांत सभेत विविध ठराव पारित करण्यात आले लायन्स क्लब चे पूर्व प्रांतपाल स्व.जीवनचंद्र निर्वाण व सदस्य स्व सुनील जावरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली संचालन लॉ सुनील जोशी , लॉ मंजिरी शेंडे, लॉ मनीषा ठक्कर यांनी केले. क्लब गरजूंना सेवा प्रदान करण्यासाठी नेहमी अग्रेसर राहणार असल्याचे लॉ विलास बुटले यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी करिता लॉ योगेंद्र कोपलवार ,लॉ चेतन कोठारी, लायन्स क्लब धामणगाव एलाईट, लायन्स क्लब धामणगाव, धामणगाव दाता व लायन्स क्लब तळेगाव दशासर यांचे सहकार्य लाभले