“मोठी बातमी ग्रामीण भागातून..!

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत बांधण्यात आलेल्या तळणी ते कासारखेडा-हिंगणगाव रस्त्याबाबत दाखल झालेल्या तक्रारीनंतर प्रशासन हरकत घेताना दिसतंय…! राज्य गुणवत्ता निरीक्षकांनी आज प्रत्यक्ष तपासणी केली असून काही गंभीर त्रुटींवर दुरुस्तीचे आदेश देण्यात आले आहेत…”  

“१८ जुलै २०२५ रोजी नितीन मेंढुले यांनी केलेल्या तक्रारीनुसार, आज १९ ऑगस्ट रोजी राज्य गुणवत्ता निरीक्षक सुरेशजी कानडे यांनी या रस्त्याची पाहणी केली. तपासणीत त्रुटी आढळल्याने संबंधित कंत्राटदाराला दुरुस्तीचे आदेश देण्यात आले.

या पाहणीवेळी अधीक्षक अभियंता विशालजी जवंजाळ, कार्यकारी अभियंता नितीनजी देशमुख, उपअभियंता पी.डी. कस्तुरे तसेच कंत्राटदार उपस्थित होते. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर झालेली ही कारवाई महत्त्वाची ठरत आहे.”

“ग्रामसडक योजनेंतर्गत रस्त्याच्या गुणवत्तेबाबत शासन किती गंभीर आहे, याचा प्रत्यय या कारवाईतून स्पष्ट झालेला आहे.

या प्रकरणातील पुढील घडामोडींसाठी पाहत राहा… वीर नायक न्यूज चॅनल

veer nayak

Google Ad