धामणगाव रेल्वे
आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 संविधान दिनाचे चे औचित्य साधून नगरपरिषद कार्यालय धामणगाव रेल्वे येथील दिव्यांग विभागा अंतर्गत सन 2024 – 25 या आर्थिक वर्षाचे 5% टक्के निधी शासकीय तरतुदीनुसार दिव्यांग बांधवांना एकूण तीन लक्ष एकोनपन्नास हजार नऊसे वीस रुपये (349920/-रू )निधीचे वाटप प्रशासक तथा मुख्याधिकारी अमोल माळकर यांच्या उपस्थितीत धनादेशा द्वारे लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात आली. धामणगाव (रेल्वे ) नगर परिषद हद्दीतील एकूण पात्र 208 दिव्यांग बांधवांना लाभ प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमावेळी नगरपरिषदेचे सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी बंधू भगिनी व बराच मोठ्या प्रमाणात दिव्यांग बांधव हजर होते. संविधान दिनी दिव्यांग निधी वाटप करून नगर परिषद कार्यालय धामणगाव रेल्वे नी आगळ्या वेगळ्या पद्धतीने संविधान दिन साजरा केला अशी चर्चा सर्व दिव्यांग बांधवामध्ये होती.