श्रीमती हिराबाई गोयंनका कन्या विद्यालयात रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन

0
17
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

श्रीमती हिराबाई गोयंनका कन्या विद्यालयात आरोग्य विषयक जनजागृती अंतर्गत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.सुनीता गो.देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती हिराबाई गोयंनका कन्या विद्यालय धामणगाव रेल्वे व ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जुलै 2025 व 31 जुलै 2025 रोजी रक्तगट तपासणी शिबिर संपन्न झाले. श्री. चंद्रशेखर पोटे व श्री. बाबासाहेब सोळंकी प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय धामणगाव रे. तसेच श्रीमती हिराबाई गोयंनका कन्या विद्यालयातील विज्ञान शिक्षक चमू मिळून एकूण 330 विद्यार्थिनींचे तर 8 शिक्षकांचे रक्तगट तपासले. प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी श्री.चंद्रशेखर पोटे यांनी विद्यार्थिनींना रक्ताचे महत्त्व व हिमोग्लोबिनचे प्रमाण याविषयी समुपदेशन केले. तर विज्ञान शिक्षिका कु.शितल जोशी व सौ. स्नेहल जुनघरे यांनी रक्तगटाचे प्रकार, *O या रक्तगटाला सर्वयोग्य दाता व AB या रक्तगटाला सर्वयोग्य ग्राही* याबद्दल मार्गदर्शन करून रक्तगट तपासण्यास मदत केली. ज्येष्ठ लिपिक श्री.रवी गिरी,श्री. राहुल पाटील,श्री.राहुल पोतदार श्री.धर्मेश पालीवाल,श्री सौरभ तितरे यांचे विशेष सहकार्य लाभले. दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रभात विभागातील पाच ते सात च्या विद्यार्थिनींचे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्याचा मानस आहे.

veer nayak

Google Ad