अशोक नगर ग्रामपंचायत च्या वतीने क्रांतीसुर्य सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान अंतर्गत महिलांकरिता आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. अशोकनगर सरपंच सौ स्नेहल मनोज कडू यांच्या पुढाकाराने अमरावती येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सौ वैशाली भोजने यांना आमंत्रित करून त्यांनी अशोक नगर येथील महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन औषधोपचार मार्गदर्शन करण्यात आले आहे . ग्रामीण भागातील महिलांच्या बऱ्याच आरोग्याच्या तक्रारी असतात . परंतु परिस्थितीमुळे ते स्त्रीरोतज्ञ डॉक्टरांच्या कडे जाऊ शकत नाही. परिणामी महिलांच्या दुर्लक्षामुळे कर्करोग, वंध्यत्व, गर्भाशयात निर्माण होणारे गंभीर आजार , कुमारवस्था व रजोनिवृत्ती सारखे आजारवर उपचार व मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याने.

या करिता असे महिलांकरिता आरोग्य शिबिर प्रत्येक गावात घेण्याचा मानस याप्रसंगी अशोक नगर येथील सरपंच स्नेहल मनोज कडू यांनी केला आहे. या शिबिराला अशोक नगर येथील आरोग्य उपकेंद्राचे डॉक्टर धीरज देशमुख व एन एम कुमारी आचल सातपुते, आशा सेविका श्रीमती प्रतिभा कडू सौ रंजना पडघान यांनी सहकार्य केले. याप्रसंगी ग्रामपंचायतच्या सदस्य सौ रेखा साठवणे सौ स्मिता कडू सौ मनीषा ठाकरे अंगणवाडी सेविका सौ रुपाली बोरकर अंगणवाडी मदतनीस सौ रजनी ठाकरे सीआरपी अश्विनी राजनकर आरोग्य सेवक कळमकर सोनाली प्रत्येकी यांनी उपस्थित होत्या शिबिरामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी आपली तपासणी करून लाभ घेतला.













