भक्ती आणि शक्तीचा, ज्ञान व विज्ञानाचा, कला आणि संस्कृतीचा हा महाराष्ट्र माझा….1 मे महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस व सोबतच आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी आपल्या विद्यालयाच्या दर्शनी फलकावर केलेले रेखाटन व सोबतच विशिष्ट पेन व रंग शैलीत महाराष्ट्र दिन निमित्ताने चित्र रेखाटन करून शुभेच्छा दिल्या आहेत …