माहेश्वरी हितकार संघातर्फे नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई रोठे (अडसड) यांचा भव्य सत्कार

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे | 

माहेश्वरी हितकार संघ, धामणगाव रेल्वे यांच्या वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई रावसाहेब रोठे (अडसड) तसेच नगरसेवक गिरीश पुखराज मुंदडा व दर्शन अनिलकुमार राठी यांचा भव्य सत्कार माहेश्वरी भवन येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई रोठे (अडसड) यांच्या हस्ते भगवान महेश यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माहेश्वरी हितकार संघाचे अध्यक्ष अनिल पनपालिया यांनी केले.

माहेश्वरी हितकार संघाच्या वतीने नगराध्यक्षा व नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी माहेश्वरी विदर्भ प्रादेशिक संघटन, माहेश्वरी अमरावती जिल्हा संघटन, माहेश्वरी ज्येष्ठ नागरिक संघटन, माहेश्वरी तालुका संघटन, माहेश्वरी भवन समिती तसेच माहेश्वरी महिला संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यवरांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

या सत्कार समारंभासोबतच महाराष्ट्र संशोधन, उन्नती प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे या संस्थेमार्फत नवीन उद्योग सुरू करण्यासाठी, विद्यमान उद्योगांना बळकटी देण्यासाठी व स्वयंरोजगार वाढीसाठी शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. अमरावती जिल्हा प्रकल्प अधिकारी राजेश सुने व जिल्हा प्रशासक केदार गोगरकर यांनी उपस्थितांना योजनांची माहिती दिली. नगराध्यक्षा सौ. अर्चनाताई रोठे (अडसड) यांनी या प्रशिक्षणाबाबत सविस्तर चर्चा केली.

कार्यक्रमात समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्ता राजेश चांडक यांनी केले तर आभार प्रदर्शन रामेश्वर चांडक यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी हितकार संघाचे अध्यक्ष अनिल पनपालिया, उपाध्यक्ष पाचन चांडक, सचिव अधिवक्ता राजेश चांडक, सहसचिव सतीश बुब, खजिनदार किशोर पनपालिया तसेच कार्यकारिणी सदस्य राधेश्याम मुंघडा, अशोक भंडारी, विशाल गांधी, कैलास राठी, किशोर मुंधडा, संदीप राठी, प्रभात राधे, ता. तापडिया व मदन राठी यांनी अथक परिश्रम घेतले.

veer nayak

Google Ad