महाविकास आघाडीतून धामणगाव रेल्वे मतदार संघातून नेमकी तिकीट कोणाला? उभाठा की राष्ट्रीय काँग्रेस पेच कायम

0
168
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे / येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जवळपास आली आहे, धामणगाव विधानसभेतून महाविकास आघाडी तर्फे नेमकी तिकीट कोणाला मिळणार याकरिता पेच निर्माण झाले आहे,

 मागील कित्येक वर्षापासून महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे माजी आमदार वीरेंद्र जगताप हे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व करत आहे, ते तीन टॉम म्हणजेच पंधरा वर्षे या मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले आहे, त्यामुळे त्यांची या मतदारसंघात चांगली पकड निर्माण झाली आहे,तर महाविकास आघाडीतीलच उभाठा गटाचे नांदगाव तालुका येथील अभिजीत ढेपे पाटील हे सुद्धा याच मतदारसंघातून तिकीट करिता त्यांनी दावा केला आहे,त्यांची सुद्धा या मतदारसंघात मजबूत पकड आहे,अभिजीत ढेपे पाटील हे सुद्धा जमिनीस स्तरापासून आलेले नेते आहे,जिल्हा परिषद सदस्य पासून तर अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते उपाध्यक्ष सुद्धा आहे, सहकार क्षेत्र पासून तर सर्वसामान्य जनतेत त्यांची मजबूत पकड आहे, त्यांनी सुद्धा महाविकास आघाडीतील उभाठा (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून) तिकीटे करीता प्रयत्न चालू आहे, त्यांनी पाच ऑक्टोंबर शनिवार रोजी शहरात खासदार अरविंद सावंत व संजय देशमुख यांची मोठी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केले,या सभेतून खासदार अरविंद सावंत तब्येत बरी नसल्याकारणाने येऊ शकले नाही पण त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सभेला संबोधित करताना धामणगाव मतदार संघातून उभाठा गटाचे अभिजीत ढेपे पाटील यांच्या मागे जनतेने खंबीरपणे उभे राहून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात मजबूत करण्या करिता कार्यकर्ते आणि जनतेला सांगितले, वाशिम यवतमाळ येथील खासदार संजय देशमुख यांनी सुद्धा उभाठा गटाचे सभ्य उमेदवार अभिजीत ढेपे पाटील हे राहतील अशी घोषणा केली,यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहण्याचे उपस्थित जनतेला आव्हान केले, त्यामुळे धामणगाव मतदार संघातून महाविकास आघाडीतून नेमकी तिकीट काँग्रेस पक्षाचे विरेंद्र जगताप किंवा उभाठा गटाचे अभिजीत ढेपे पाटील यापैकी कोणाला मिळणार याकरिता पेच निर्माण झाला आहे,

veer nayak

Google Ad